अवसरी बुद्रुक येथील जय मल्हार युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्या विकास मंदिर, नेताजी सुभाष विद्यालय अवसरी बुद्रुक गावातील सर्व अंगणवाडी मधील सर्व बालचमु यांना शाळेतील पहिल्या दिवशी लाडू वाटपाचा कार्यक्रम गोड तोंड करून जय मल्हार प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत केले गेले.
नव्यानेच सुरू झालेल्या या प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम राबवले जात असतात, त्यामध्ये पहिली ते दहावी पर्यंत एक मुलगा आणि एक मुलगी असे गरीब आणि होतकरू मुले यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी अश्या वीस मुलांची प्रतिष्ठान खर्च करणार आहे, या प्रतिष्ठानच्या सभासदांनी एकत्र येऊन अवसरी बुद्रुक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे, या वेळेस संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे , प्राचार्य सुरेश जारकड, पर्यवेक्षक माधुरी खानदेशे, माजी प्राचार्य अंकुश शिंगाडे व जय मल्हार ग्रुप चे सर्व कार्यकर्ते हे त्या ठिकाणी उपस्थित होते. पुढील काळात जय मल्हार प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत असे सचिन छबन हिंगे यांनी सांगितले.
या बरोबर अवसरी बुद्रुक गावामधील शाळेचा शंभर टक्के निकाल यावर्षी देखील लागल्या बद्दल, विद्या विकास मंदिर च्या प्राचार्य पदी सुरेश जारकड यांची निवड झाल्याबद्दल व गावातील दोन विद्यार्थी प्रशासकीय सेवेतून त्यांची निवड झाली माधुरी मच्छिंद्र पोखरकर व अनिकेत सुधीर शिंदे या दोघाचा प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला.
Home आपलं आंबेगाव अवसरी बुद्रुक मधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना जय मल्हार युवा प्रतिष्ठानच्या वतीने लाडूचे...