ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्याच गावात रोजगाराची संधी जर उपलब्ध करून दिली तर त्यांच्या जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही या हेतूनच ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील कवयित्री शांताबाई शेळके सभागृहात आयोजित कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर शिबिर आयोजित केले होते उद्घाटन प्रसंगी श्री वळसे पाटील बोलत होते. यावेळेस प्राचार्य दिलीप पानगव्हाणे, प्राचार्य विठ्ठल बांदल, प्रवीण पंडित, अमोल जाधव, वैभव नायकवडी, विष्णूकाका हिंगे, सचिन पानसरे, उपसभापती संतोष भोर, आनंद शिंदे,अशोक बाजारे, लक्ष्मण थोरात, दिनेश खेडकर, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज व माणिकडोह, घोडेगाव, अवसरी खुर्द, गावडेवाडी या संस्थांचे आयटीआय चे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले आयटीआय प्रशिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे, व्यवसायभिमुख शिक्षण घेतल्याशिवाय ग्रामीण भागात जीवनमान उंचावणार नाही. अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंजिनीयर पेक्षा आयटीआय शिक्षण घेणाऱ्याना प्राधान्य दिले जात असल्याचे निदर्शनात येत आहे. पुढील काळात छोट्या उद्योगांना प्रतिसाद देणे हे जास्त महत्त्वाचे आहे, या मुळे सर्व समावेशक विकास व्हायला मदत होईल आणि छोट्या उद्योगांना देखील रोजगार मिळू शकेल या योजनेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील युवा स्वयंरोजगारासाठी उद्योग उभे करतील असे ते म्हणाले दहावी बारावी पास झालेल्या विद्यार्थी ज्यांना या वेगवेगळ्या आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला आणि ते शिक्षण घेतात नेहमीच या विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रश्न असतो की आयटीआय झाल्याच्या नंतर मला नोकरी मिळेल का माझं उपजीविकेचा साधन मला मिळेल का आणि त्याच्या संदर्भात फारसं काही आई-वडील सुद्धा त्यांना फार मार्गदर्शन करू शकत नाही, शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा हे मार्गदर्शन बऱ्याच वेळेला अभावाने मिळते, म्हणून आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल असे वळसे पाटील म्हणाले.
Home आपलं आंबेगाव ग्रामीण भागातील तरुणांना त्यांच्याच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर त्यांचे...