आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुमारे १३००० सीड बॉल तयार करण्याचा उपक्रम राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी सांगितले.
अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर या विद्यालयात सुमारे 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, संस्थेचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड साठी विद्यालयाने प्रयत्न करावे या संकल्पनेतून प्राचार्य सुरेश जारकड व पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी सीड बॉल तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले, विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन पाहून मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी विद्यालयात येऊन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी यासाठी दहा सीडबॉल तयार करून आणणार आहेत, हे सर्व सीड बॉल जवळच असणाऱ्या हिंगे मळा, गुणगे मळा व वाघदरा डोंगरावर विद्यार्थ्यांच्या मार्फत विखुरले जाणार आहेत. विद्यालयाची पटसंख्या पाहता कमीत कमी 13000 सिडबॉल तयार होणार असल्याचे प्राचार्य जारकड यांनी सांगितले, यामुळे डोंगराळ भागात झाडे लागवडगीपेक्षा सीडबॉलमुळे झाडे उगवणार आहेत.
सीट बॉल प्रशिक्षणासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस वनपाल प्रदीप कासारे वनरक्षक सीएस शिवचरण ऋषिकेश कोकणे व अरुण खंडागळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्मिता राजहंस म्हणाल्या आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास संपुष्टात येत असल्याने ते रहिवासासाठी उसाच्या क्षेत्राकडे येऊ लागले आहे मात्र प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग अथवा माळरानावर पावसाळ्यात सीडबॉल टाकले तर पुढील काळात झाडे झुडपे वाढून बिबट हा वन्यप्राणी डोंगराळ भागातच वास्तव्य करू लागेल. विद्या विकास मंदिरांनी हातात घेतलेला हा प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच विद्यालयाने सीड बॉल तयार करण्याचा हा उपक्रम राज्यातील पहिलाच असू शकतो, असून इतर शाळांनीही त्यांचे अनुकरण करावे असे आवाहन देखील या वेळेस त्यांनी केले.
यावेळेस विद्या विकास मंदिरातील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य सुरेश जारकड यांनी केले,सूत्र संचालन सचिन रोकडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी मानले.