पतसंस्थेतील एक लाख रुपयांच्या ठेवींना संरक्षण मिळणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील.

914
Google search engine
गोरगरिबांनी पै पै गोळा करून आपल्या भविष्यासाठी निधी पतसंस्थेत ठेवतात मात्र त्या पतसंस्थेत दुर्दैवाने आर्थिक अडचणीत आली तर गोरगरिबांच्या ठेवी सुरक्षित राहावे या साठी महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळाला पतसंस्थाच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी शंभर कोटीची निधी उपलब्ध करून देण्यात येणार आसल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील कामकाजाची माहिती दिली  यावेळी त्यांनी तालुक्यात असणाऱ्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी बोलताना ते म्हणाले समाजातील गोरगरीब जनता आपल्या भविष्यातील उदरनिर्वाहासाठी पैसे पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करत असतात दुर्दैवाने चुकून एखाद्या पतसंस्थेत आर्थिक अडचण आल्यानंतर गोरगरिबांना गुंतवणूक केलेले पैसे मिळण्यासाठी मोठे कष्ट, तसेच ते पैसे बुडण्याची भीती निर्माण होते याचा विचार करून सहकार खात्याने पतसंस्थांना शंभर रुपया मागे दहा पैसे आकारून गोरगरिबांच्या पतसंस्थेत केलेल्या एक लाख रुपये ठेवीस सुरक्षा दिली आहे.य मुळे सभासदांचा पतसंस्थेकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारमत्क राहील.तसेच आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या मध्ये  तीन विभाग येणार आहे त्यात इलेक्ट्रिक व्हेईकल, एड्यूटिंग मॅन्युफॅक्चरिंग,  इंजीनियरिंग सिव्हिलिएशन या लॅब तयार करून उत्कृष्ट  विद्यार्थी घडविणार आहे अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.
Google search engine