मंचर : मंचर जैन युवक संघातर्फे एकलहरे येथील शामादार बाबा डोंगरावर पर्यावरण समतोल राखण्यासाठी 251 वृक्ष लागवड करत पर्यावरणाचा संदेश दिला आहे.
मंचर जैन युवक संघातर्फे शामादार बाबा डोंगरावर एकलहरे ग्रामस्थ व वन विभागाच्या मदतीने 251 झाडे लावण्याचा संकल्प केला होता, त्यानुसार एकलहरे ग्रामपंचायत मंचर वनविभाग व जैन युवक संघातर्फे डोंगरावरील मोकळ्या भागात खड्डे घेऊन 251 झाडे लावण्यात आली यावेळी एकलहरे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष डोके, संदीप डोके, वनपाल शशिकांत मडके, ग्रामस्थ व जैन युवक संघाचे युवक व युवती उपस्थित होते. या ठिकाणी झाडे लागवड करताना सर्व देशी झाडे लावण्यात आली आहेत यामध्ये वड, पिंपळ, आवळा, करंज, लिंब, शिसव, बेल कधी प्रकारची देशी झाडे जैन युवक संघातर्फे लावण्यात आली यासाठी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांचे सहकार्य लाभले असून या वृक्ष लागवडीचे नियोजन संघवी अभिजीत समदडिया हर्षल गांधी, अमित पूनमिया व पियुष पारेख यांनी केले होते.