सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मागण्यां संदर्भात मा ना श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि. 18 जुलै 2024 रोजी संपन्न झाली.
यामध्ये डिंभे धरणाच्या वरील बाजूकडील आदिवासी क्षेत्रातील वंचित शेतीला पाणी देण्यासाठी प्रस्तावित कळमजाई, फुलवडे व बोरघर या उपसा सिंचन योजनांची मंजुरी आदिवासी विभागाच्या निधीतून पूर्ण करण्याच्या अटीवर होती. आता या उपसा सिंचन योजनांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्यांना सुरुवातीला कुकडी प्रकल्पाच्या उपलब्ध निधीमधून निधी देऊन या योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांना आदिवासी विभागाकडून मिळणारा निधी हा परतफेड स्वरूपात नंतर घेण्यात येणार आहे.
डिंभे उजव्या कालव्यावरील लोणी धामणी परिसरातील शेतीला सिंचन लाभ देणाऱ्या प्रस्तावित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजनेस कुकडी प्रकल्प फेरजल नियोजनात पाणी उपलब्ध करून देऊन या योजनेचा कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घोड मीना व कुकडी नदीवरील 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्यास शासनाने तत्वता मान्यता दिली आहे आता WAPCOS या संस्थेकडून करण्यात येत असलेल्या कुकडी प्रकल्प फेर जल नियोजन अभ्यासामध्ये या बंधार्यांना पाणी उपलब्ध करून या 65 कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यांचा कुकडी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये कुकडी प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिंभे धरणापासून सुरू होणारा डिंभे डावा कालवा 55 किलोमीटर लांबीचा आहे. सततच्या आवर्तनांमुळे कालव्याची दुरावस्था झाली होती सन 2021-22 मध्ये दिलीप वळसे पाटील यांच्या पाठपुराव्यामधून या कालव्याच्या दुरुस्तीसाठी 27 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता आता डिंभे डावा कालवा विशेष दुरुस्तीसाठी उर्वरित 70 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून संपूर्ण डिंभे डाव्या कालव्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डिंभे माणिक डोह बोगद्याच्या तळपातळी बाबत फेरविचार करण्याच्या सूचना यापूर्वीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेतच. आता डिंभे डावा कालव्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने डिंभे डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालणार असल्याने डिंभे माणिक डोह बोगद्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे या बाबीचा देखील फेरविचार अभ्यासामध्ये समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शिरूर तालुक्यातील पाबळ केंदूर परिसरातील चासकमान आणि कुकडी प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित बारा गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करण्यासाठी सविस्तर सर्वेक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला. यानुसार या वंचित 12 गावातील अस्तित्वातील तलाव पावसाळा कालावधीमध्ये कुकडी प्रकल्पातून किंवा चास कमान प्रकल्पातून घोड /भीमा नदीवरून भरून देणे तसेच याव्यतिरिक्त नवीन जलसंधारण तलाव बांधण्याचा देखील या अभ्यासामध्ये समावेश असणार आहे. अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.