आंबेगाव तालुक्यात नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेली विकास कामे दर्जेदार व्हावीत याकरिता ग्रामपंचायत, स्थानिक नागरिकांनी जागरुकतेने काम करुन घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी अवसरी बुद्रुक येथे केले.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या अवसरी बुद्रुक ते टाव्हरेवाडी रस्ता काँक्रिट करणे, ( मंजूर रक्कम रु.५० लक्ष), या विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले.
अवसरी बुद्रुक ते पिंपळगाव खडकी रस्ता मालवाहतूक, दूध उत्पादक तसेच तरकारी वाहतुकीच्या दृष्टीने वर्दळीचा रस्ता आहे. अवसरी बुद्रुक गावच्या बैलगाडा घाटाच्या जवळील भाग हा कायम दलदलीचा असून येथील रस्ता कायम दुरुस्ती करावी लागत होती. ग्रामपंचायत अवसरी बुद्रुक तसेच टाव्हरेवाडी ग्रामपंचायतने दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन सदर रस्त्याची बाब लक्षात आणून दिली असता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्वरीत निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने रु.५० लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. या भागावर १५० मीटर लांबीवर दुप्पट थराचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असून साईडपट्टीचे काम असणार आहे. अशी माहिती विवेक वळसे पाटील यांनी दिली. यावेळेस आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे,अवसरी बुद्रुकचे सरपंच सारिका ताई हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे पाटील, कल्याणराव हिंगे, प्रशांत वाडेकर, अंकुश चौरे, पांडुरंग गायकवाड, संग्राम गायकवाड, मयूर जाधव व टावरेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.