मंचर श्री जैन संघातर्फे आयोजित आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळून १३० व्यक्तींनी या आरोग्य शिबिराचा फायदा घेतला अशी माहिती संघवी अभिजीत समदडिया यांनी दिली.
श्री जैन संघ मंचर यांच्यावतीने जैन समाजातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते, जैन समाजातील बहुतांश व्यक्ती ह्या व्यवसायाशी निगडित असल्याकारणाने आरोग्याकडे व्यवसायामुळे अनेक वेळा दुर्लक्ष होते, यामुळे संघवी अभिजीत समदडिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जैन मंचर संघाच्या वतीने आरोग्य शिबिर मंचर येथील प्रगती हॉस्पिटल, डॉ. कांचन स्वप्निल खिलारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्याचे सुचविले होते. यामध्ये रक्तदाब, मधुमेह, एच बी, ई सी जी, युरिक ॲसिड, एच आर कॅल्शियम, अश्या सोळा प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. याचबरोबर महिलांसाठी महत्त्वाच्या विषयावर समुपदेशन करण्यात आले. यामध्ये पीसीओडी समस्या, वजन कमी करण्याचे व्यवस्थापन, मासिक पाळीचे आजार, आहार विशेष समुपदेशन, व्यंंध्यत्व तपासणी व समुपदेशन, सौंदर्य व सौंदर्यप्रसादानाचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, एच पी व्ही लसीकरण समुपदेशन, कुटुंब नियोजन समुपदेशन डॉ. कांचन खिल्लारी यांनी केले. या आरोग्य तपासणी कॅम्पला गोवर्धन समूहाचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांनी भेट दिली.
या कार्यक्रमाचे व्यवस्थापन भावेश पुंगलिया, अश्विन लोढा, दिपेश चोरडिया, शुभ गांधी, वैशाली पुंगलिया, ज्योती लोढा, योगिता चोरडिया, अक्षदा गांधी यांनी केले.
मंचर जैन संघातर्फे डॉ. कांचन खिल्लारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.