अवसरी बुद्रुक येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान) राज्यस्तरीय मंथन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.या परीक्षेत विद्यालयाचे 350 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
अवसरी बुद्रुक केंद्रातून उत्तुंग यश संपादन केलेले विद्यार्थी इयत्ता 5 वी गावडे संस्कृती संतोष 270 गुण, हिंगे अविष्कार सुरेश 266 गुण, चव्हाण आर्या बाबाजी 264 गुण, हिंगे सई माणिक 258 गुण इयत्ता 6 वी बेंडे सृजन सचिन 244 गुण, गुरव स्वानंद राम 212 गुण,कदम सिद्धी शंकर 196 गुण, पिंगळे गौरी रमेश 194 गुण. इयत्ता 7 वी डोके अनुष्का गणपत 226 गुण, मुळे मनस्वी महालिंग 198 गुण, जाधव स्वरांजली आनंदा 188 गुण. इयत्ता 8 वी अरगडे सेजल रवींद्र 230 गुण, वाघ शार्विल सुनील 226 गुण.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिष्यवृत्ती विभागप्रमुख सुदर्शन शेवाळे व बाबाजी चव्हाण यांच्यासह भाषा,गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले,अशी माहिती पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी दिली.या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळी अवसरी बु.चे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे पाटील व सर्व संचालक मंडळ, विश्वस्त,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन हिंगे,विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जारकड यांनी अभिनंदन केले आहे.