भीमाशंकरचा अंतिम ऊस दर रु. ३२००/- प्रती मे. टन जाहीर….

 जाहिरात

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मागील सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी अंतिम ऊस दर रु.३२००/- प्रती मे. टन जाहीर केला असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

मा. वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सन २०२३-२४ गाळप हंगामात कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या संपूर्ण ११ लाख ९ हजार ४६८ मे. टन ऊसासाठी कारखान्याने एफ.आर.पी. नुसार रु. २७९०.१० प्रती मे. टन दर येत असतानाही यापूर्वी रु. २९५०/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. ३२७ कोटी २९ लाख ३० हजार एकरक्कमी ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केलेली आहे. याशिवाय १.८३ लाख मे.टन खोडवा उसासाठी रु. १००/- प्र.मे.टनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांना अदा केली आहे. ऊस तोडणी व वाहतूक दरामध्ये झालेल्या वाढीमुळे ऊस तोडणी व वाहतूक खर्चात रु. १३७/- प्रती मे. टन वाढ होवूनही रु. ३२००/- प्रती मे. टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अंतिम हप्ताची रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांचे बँक खात्यावर दिवाळी सणापूर्वी वर्ग करण्यात येणार आहे.
कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर व खोडवा अनुदान वेळेतच अदा केलेले आहे. त्याशिवाय एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर अदा केलेला असूनही दरवर्षीप्रमाणे दिवाळीसाठी अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतक-यांना अदा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांची दिवाळी गोड होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे. भीमाशंकर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतक-यांना जास्तीचा दर दिलेला असून यापुढेही हि परंपरा कायम राहील. तरी गाळप हंगाम २०२४-२५ करीता कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्याची भावना ठेवावी अशी विनंती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

 जाहिरात