भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे दिवाळी साखर वाटपाचे धोरण जाहीर…

Google search engine

डॉ.अतुल साबळे.

पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद व ऊस उत्पादकांसाठी प्रतिवर्षीप्रमाणे दिपावली निमित्त महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शनानुसार व मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार रु. २०/- प्रति किलोप्रमाणे साखर वाटपाचे धोरण निश्चित केले असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

सभासद व ऊस उत्पादकांना भविष्याचा विचार व आधुनिक प्रणालीचा वापर करून स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षी साखरेचे वाटप कारखान्याचे भागधारक व गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पुरविलेला आहे यांचेसाठी पुर्ण भागधारक (रु. १०,०००/-) व ऊस उत्पादक यांना ८० किलो, फक्त भागधारक अथवा फक्त ऊस उत्पादक यांना ६० किलो व अपुर्ण भागधारक व ऊस नाही यांना ५० किलो याप्रमाणे १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये गावोगावी दिवाळीपूर्वी साखर वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे. गावोगावी साखर वाटपाचे नियोजन झालेनंतर गट, गाव तारखेनुसार प्रसिद्ध करण्यात येईल. गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप केलेल्या उसासाठी अंतिम बाजारभाव रु.३,२००/- प्रती मे. टन जाहीर केल्याने सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

Google search engine