अवसरी बुद्रुक (ता . ओबेगाव ) येथील खंडोबा माळ येथे बिबट्याने उच्छाद मांडला असून दिवसा व रात्री बिबट्या नागरिकांच्या नजरेस पडत आहे या बिबट्याचा वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी संजय विठ्ठल हिंगे व अवसरी बुद्रुक च्या सरपंच सारिका विलास हिंगे व ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
अवसरी बुद्रुक च्या उत्तरेला खंडोबा माळ ही वस्ती आहे येथे संजय हिंगे यांची शेती व शेळीपालन व कोंबड्या पालन व्यवसाय आहे सोमवारी पहाटे (ता . २७ ) रोजी . बिबट्याने कोंबड्यांच्या खुराड्यावर हल्ला केला कोंबड्यांच्या मोठ्या आवाजाने व कुत्री मोठमोठ्याने भुंकल्याने बिबट्याने जवळच्या उसात पळ काढला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली असून वनविभागाने येथे त्वरित पिंजरा लावावा व या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ही सरपंच सारिका विलास हिंगे ग्रामस्थ संजय हिंगे व शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे या भागात ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा आहे त्यामुळे भक्षाच्या शोधासाठी बिबटे या ठिकाणी वावरत आहेत उसाचे क्षेत्र असल्याने या उसाच्या शेतात बिबटे लपतात रात्री व दिवसाही बाहेर पडतात त्यामुळे या बिबट्यांचा वनविभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे नागरिक दिवसाही घराबाहेर पडायला घाबरत आहेत .बिबट्याने माणसांवर हल्ला करण्याची वाट वनविभागाने पाहू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.