विद्या विकास मंदिर या विद्यालयाने चालू वर्षी प्रथमच ग्रामीण भागात कलाविष्कार चित्र व कास्ट शिल्प प्रदर्शन आयोजित केले होते, ग्रामस्थ व तालुक्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला असल्याची माहिती प्राचार्य सुरेश जारकड यांनी दिली.
कला शिक्षक संतोष चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेली अनेक चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. या चित्रांमध्ये काही चित्रे माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा ठेऊन आपले कला गुण सादर केले, माजी विद्यार्थी आदेश शहा यांनी आपल्या संकल्पनेतून तयार केलेली कास्ट शिल्प ही सर्वाची वाहवा मिळवून गेली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे व साई चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्ता ठुबे यांनी केले.
सलग चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रदर्शन चांगले होण्यासाठी मोठी मेहनत घेतल्याचे पर्यवेक्षिका माधुरी खानदेशे यांनी सांगितले.
प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज व जिजामाता यांची काढलेली रांगोळीने सर्वाचे लक्ष वेधले होते.