अवसरी बुद्रुक येथे धर्मराया यात्रा संपन्न.

Google search engine

वर्षानुवर्ष परंपरेनुसार चालत आलेला धर्मराज बीज यात्रोत्सव अवसरी बुद्रुक येथे संपन्न झाला असून हजारो महिला, पुरुष, युवक,युवतींनी या यात्रेत सहभागी झाले. परंपरेनुसार ही यात्रा मडक्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध होते मागील 10-15 वर्षापासून या यात्रेत मडकी, रांजण ,कुंड्या विक्री साठी येणे बंद झाल्याने एक परंपरा काळाच्या ओघात लुप्त झाल्याचे जुने ज्येष्ठ नागरिक सांगत आहे.

धर्मराज बीज उत्सव म्हणजेच अवसरी बुद्रुक या गावची धरमराया ( मडक्याची यात्रा )ची यात्रा पूर्वी या यात्रेचे फार आकर्षण असायचं यात्रेच्या आधी एक महिना अवसरी बुद्रुक च्या कुंभारवाड्यातील कुंभार समाज महिनाभर गाढवांच्या साह्याने पाण्याचे माठ, रांजण, कुंड्या आदी मातीच्या वस्तू आपल्या हाताने बनवलेल्या विक्रीसाठी या यात्रेत आणत असत, ते पाहताना फार वेगळीच मजा येत असे,पहाटे चार वाजल्या पासून रात्री पर्यत मडकी गाढवावर वाहण्याचा कार्यक्रम चालत असे. पूर्वी अवरीतील दत्तात्रय चव्हाण, महादू चव्हाण, सुदंर चव्हाण, वालू चव्हाण, जिजाबाई चव्हाण, मधु चव्हाण, चंदर चव्हाण,भगवान चव्हाण, रामचंद्र चव्हाण, दगडू चव्हाण व अनेक जण हे आपली परंपरा कायम ठेवत तीन तीन चार चार महिने माठ, रांजण, कुंड्या बनवत धरायचे यात्रेची तयार करत असे ही सर्व मंडळी चाकावर मडकी घडविण्याचे काम करत असे, त्यांच्या घरातील महिला हाताने रांजण तयार करत असे कालांतराने दत्तात्रय चव्हाण यांनी इलेक्ट्रिक चाक घेतले त्यावर त्यांनी माठ घडवायचे काम सुरू केले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून अवसरीतला कुंभार समाज प्रसिद्धीच्या झोतात आला ३० ते ३५ वर्षापूर्वी कित्येक गावात टीव्ही सुद्धा उपलब्ध नव्हते रेडीओ सायकली दुर्मिळ होत्या त्याकाळात दत्तात्रय चव्हाण हे दूरदर्शन वर चमकले आणि अवसरी बुद्रकमधील कुंभार समाजावर दूरदर्शनच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले आधीच अवसरी बुद्रुक कलावंतांची अवसरी म्हणून प्रसिद्ध होती त्यात दत्तात्रय चव्हाण यांच्या दूरदर्शन केलेल्या स्पेशल रिपोर्ट मुळे अधिक अवसरी प्रकाशझोतात आली होती. २००५ साली धर्मराया यात्रेत शेवटची मडकी विक्रीस आली होती, त्यानंतर अवसरी च्या धर्मरायच्या यात्रेत मडकी विक्रीस येणे बंद झाली, खऱ्या अर्थाने ही यात्रा म्हणजे मडक्याची यात्रा म्हणूनच प्रसिद्ध होती आजच्या चालू पिढीला सांगावे लागते की मडक्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध होती ह्या यात्रेसाठी हजारो मडकी ,रांजण विक्रीसाठी येत होते यात्रेत पुणे खेड चाकण जुन्नर नारायणगाव मंचर शिरूर पाबळ आदी परिसरातून सुद्धा ग्राहक खास मडकी रांजण घेण्यासाठी येत असल्याचे मला आठवते काळाच्या ओघात जमाना फास्ट झाला शहरांमध्ये उन्हाळ्यात देशी मडक्यांची जागा राजस्थानी मडक्यांनी घेतली पण देशी कळ्या मातीच्या मडक्यांमधे जे पाणी गार होतं ते लाल मडक्यात होत नाही लोकांना गरज असतानाही जास्त प्रमाणात आता काळी मडके तयार होत नाही त्यासाठी कुंभार समाजाला पूर्वी सारखी माती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही सध्या अवसरी बुद्रुक मध्ये श्यामकांत चव्हाण,शंकर चव्हाण,पांडुरंग चव्हाण, पाबळकर आणि थोडेफार कारागीर हे काम करतात त्यांनाही पुणे-मुंबई या ठिकाणाहून त्यांना मोठी मागणी असते ती कच्चामाल व वेळेअभावी पुर्ण त्यांना करता येत नाही परंतु ग्रामस्थ व कुंभार समाज, धर्मराज मित्र मंडळ यांनी उचल खाल्ली तर नक्की अवसरी चे पूर्वी असणारे एकेकाळचे वैभव मडक्याची यात्रा आपल्याला पुन्हा दिसू शकते.
आता मात्र या मडक्याच्या यात्रेची जागा हॉटेल, खेळणीची दुकाने यांनी घेतली असून यात्राचे वैभव टिकून आहेत.
या यात्रेसाठी देवाचे भक्त शिंदे मंडळी, माळी समाजातील मंडळी व धर्मराया मित्र मंडळ व परिसरातील नागरिक यात्रा चांगली होण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Google search engine