सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेठ वाडेकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["picsart"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
Google search engine

शून्यातून विश्व निर्माण केले असे अवसरी बुद्रुक चे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भास्करराव वाडेकर यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाडेकर कुटुंबीय हे अवसरी बुद्रुक मध्ये आपला पारंपारिक व्यवसाय करत भास्करराव वाडेकर यांनी चांगले शिक्षण घेऊन भूविकास बँकेत अधिकारी म्हणून कार्य केले त्यांनी आंबेगाव बरोबरच इतर तालुक्यातही बँकेचे काम केले त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. सेवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती थोडीशी हलाक्याची झाली होती. त्यानंतर त्यांचा स्वर्गवास झाल्यावर त्यांचा मुलगा अजित व प्रशांत यांनी आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला अजित वाडेकर यांनी आपला पारंपारिक बांगडी व्यवसायाबरोबरच भांड्यांच्या व्यवसायामध्ये भरभराट आणण्याचा प्रयत्न केला व प्रशांत वाडेकर यांनी मेडिकल स्टोअर्स या क्षेत्रात व्यवसाय सुरू केला त्यातूनही त्यांची परिस्थिती सुधारत नव्हती. अशातच त्यांना आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रेरणेतून प्रशांत यांच्या पत्नी रेवती वाडेकर यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली त्यांची गावात असलेली सामाजिक बांधिलकी, भास्करराव वाडेकर यांनी जोपासलेली माणुसकी यातून रेवती वाडेकर यांना गावाने भरपूर निवडणुकीसाठी साथ दिली याचबरोबर जिल्हा परिषद गटाने देखील मोठ्या प्रमाणावर साथ देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आणि इथूनच प्रशांत वाडेकर यांची परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. एकीकडे रेवती वाडेकर जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद गट असो अथवा अवसरी बुद्रुक गावातील ग्रामस्थ असो यांना शासनाच्या विविध वैयक्तिक अथवा सामाजिक योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न प्रशांत वाडेकर यांनी सुरू केले. त्यानंतर हळूहळू बांधकाम क्षेत्रात त्यांनी आपले पदार्पण करून शासकीय बांधकाम घेण्याचे प्रयत्न सुरू केले सुरुवातीला भागीदारीत हा व्यवसाय सुरू केला हळूहळू स्वतःच्या ताकदीवर व जिद्दीवर स्वतःच या क्षेत्रात आपले बंधू अजित वाडेकर यांच्या सहकार्याने या क्षेत्रात जम बसविला व आपली व कुटुंबाची आर्थिक बाजू भक्कम केली एकीकडे कुटुंबाची परिस्थिती सुधारत असताना गावातील अनेक नागरिकांना गोरगरिबांना शासनाच्या वैयक्तिक योजना मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःचा खर्च करून त्या ग्रामस्थांना मिळवून दिल्या गावात अनेक महत्त्वकांशी प्रकल्प प्रशांत वाडेकर यांनी आणले सलग दोन ग्रामपंचायतीला वार्ड क्रमांक तीन मधून भरघोस मतांनी निवडून आले, त्यांनी स्वतःच्या वाढचा नुसता विकास केला नाही तर इतर असणाऱ्या गावातील वॉर्डमध्ये देखील विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे, भविष्यात यापेक्षाही त्यांच्या हातून मोठे काम होवो त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Google search engine