निरगुडसर येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा.

Google search engine
निरगुडसर तालुका आंबेगाव येथे शेतात मृत अवस्थेत असलेला बिबट्या चा बछडा आढळून आला असून वनविभागाने त्याला ताब्यात घेऊन अवसरी वन उद्यान येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. 
दरवर्षी ऊस तोडणी हंगामा दरम्यान उसात राहत असलेले बिबट्या व त्यांचे बछडे ऊस तोडणी मुळे सैरभैर होत असतात त्यामुळेच अनेक वेळा मादी बिबट्यापासून बछडे दूर जातात यामुळे फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अनेक बिबट्यांच्या बछड्यांचा मृत्यू होतो अथवा त्यांना बिबट्या मादी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असतो काल दि. 2 फेब्रुवारी रोजी निरगुडसर येथील थोरात मळ्यातील विक्रम मेंगडे यांनी वनरक्षक अश्विनी डफळ यांना फोन करून सांगितले सुनील रामचंद्र थोरात यांच्या शेतात बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला आहे. ही माहिती मिळतच डफळ यांनी घटनास्थळी जाऊन बछड्याची पाहणी केली.त्यांच्या समवेत पुजा बाबाजी थोरात या होत्या. साधारण सहा ते सात महिन्याचा बछडा मादी जातीचा आहे. यावेळेस वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक अश्विनी डफळ, बिबट शिघ्र कृती दलाचे मनोज तळेकर,कुणाल गावडे , हर्षल चौधरी , हर्षल गावडे , धर्मेंद्र ढगे , चारूदत्त बांबळे यांनी मृत बछडा ताब्यात घेतले.
बिबट्याच्या बछड्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे काय, याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वनअधिकारी यांनी केली.व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. बिबट्याचा बछडा दोन बिबट्यांच्या परस्पर झालेल्या लढतीत मृत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. बछड्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
Google search engine