आंबेगाव तालुक्यात ज्येष्ठांना लुबाडण्याच्या घटना सुरू.

 जाहिरात

मंचर : रस्त्याने येत असलेल्या मेंढपाळ व मेंढ्यांच्या कळपामुळे ज्येष्ठ नागरिक महिलेचे कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी होण्यापासून वाचले मात्र मंगळसूत्र लंपास करण्यात चोरटे जरी यशस्वी झाले असले तरी मेंढपाळाच्या येण्यामुळे मारहाण होण्यापासून जेष्ठ नागरिक महिला वाचली आहे, ही घटना आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात आंबेगाव व शिरूर तालुक्याच्या शिवेवरून मधल्या रस्त्याने खडकवाडी येथे येत असताना घडली आहे.
खडकवाडी ता. आंबेगाव येथील वत्सलाबाई दत्तात्रय सुक्रे (वय ७०) या ज्येष्ठ नागरिक महिला मागील आठवड्यात कवठे ता. शिरूर येथून एसटी बसने शिरूर पारगाव रस्त्यावर उतरून मधल्या रस्त्याने पायी धुमाळ स्थळ रस्त्याने खडकवाडी येथील आपल्या घरी येत असताना मोटरसायकल वरून आलेल्या अज्ञात दोन तरुणांनी त्यांना अडवून दमडाटी करत एका तरुणाने त्यांना ओढून रस्त्याच्या कडेला नेले हा प्रकार पाहून त्या घाबरल्या काही अवस्थेत त्यांनी प्रतिकार करण्यास सुरुवात करताच त्या तरुणाने त्यांना खाली पाडून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकून घेतले, हा प्रकार चालू असतानाच समोरून रस्त्यावरून एक मेंढपाळ आपला मेंढ्यांचा कळप घेऊन येत होता हे दिसताच अज्ञात दोन तरुणांनी तेथून सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पळ काढला. समोरून आलेल्या मेंढपाळामुळे वसालाबाई सुक्रे यांच्या कानात असणाऱ्या सोन्याच्या कुड्या व गळ्यातील सोन्याचा डोळा चोरी होण्यापासून वाचला. या घटनेने वसलाबाई सुक्रे ह्या प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले अशी माहिती सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष सुक्रे यांनी सांगितली.
वत्सलाबाई सुक्रिया खाजगी रुग्णालयात दाखल असल्यामुळे तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली नसून त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात असल्याचे कळते.
अज्ञात दोन तरुणांनी रस्त्याने जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिलेला ओढत नेऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास केले. तालुक्यात यापूर्वीही अनेक अज्ञात भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करून त्यांच्या जवळील मौल्यवानऐवज तसेच रोख रक्कम लंपास करण्याच्या घटना घडल्या आहेत.

जेष्ठ नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

 जाहिरात