शिवशक्ती फाऊंडेशन आयोजित सॅनिटरीपॅड अव्हेरणेस बाबत सत्र हिरकणी विद्यालय गावडेवाडी येथे संपन्न.

 जाहिरात

शिवशक्ती फाउंडेशन मंचर आयोजित व इनरव्हील क्लब यांचे सहकार्याने ०४ फेब्रुवारी रोजी हिरकणी विद्यालय गावडेवाडी येथे सॅनिटरी नॅपकिन बद्दल जनजागृती अभियान घेण्यात आले.

”कळी उमलताना” या विषयावर डॉ. दीप्ती साळी यांनी मार्गदर्शन करून किशोरवयीन मुलींसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिवशक्ती महिला फौंडेशन व इनरव्हील क्लब यांनी मुलीसोबत मासिक पाळीचे महत्व व मुलींचा रोजच्या जीवनातील योग्य आहार व व्यायाम याचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थी व महिला शिक्षक यांनी कार्यक्रमास चांगला प्रतिसाद देऊन दिलखुलास पणे चर्चा केली. यावेळी हिरकणी विद्यालयाचे प्राचार्य विनोद बोंबले, शिक्षिका मनिषा भोर, ज्योती दहितुले तसेच शिवशक्ती फौंडेशनचे पदाधिकारी अ‍ॅड. स्वप्ना पिंगळे/खामकर, इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष डॉ. मेघा गाडे, डॉ, दीप्ती साळी, मनिषा चासकर, दिशा अभंग उपस्थित होते. या कार्यक्रमास शेतकरी राजा उद्योग समुहाचे बाबाजी शेठ टेमकर यांच्या वतीने विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी हिरकणी विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले.

 जाहिरात