बॅंक आँफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने मंचर नगरपंचायतीस १०० ट्री गार्ड भेट.

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

मंचर (ता.आंबेगाव) येथील बँक ऑफ महाराष्ट्र मंचर शाखेच्या वतीने मंचर नगरपंचायत ला १०० ट्री गार्ड चे वाटप बॅंक ऑफ महाराष्ट्र मंचर शाखेच्या वतीने करण्यात आले.अशी माहिती मंचर शाखाधिकारी आशिष देशमुख यांनी दिली.

बॅंक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर बिच्छेंद्र मल्लीक उप झोनल मॅनेजर अनिल गिरसावळे तसेच बॅंकऑफ महाराष्ट्र मंचर शाखेचे शाखा प्रबंधक आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचर शाखाधिकारी आशिष देशमुख यांनी सांगितले कि, झाडे लावा झाडे जगवा अशी प्रत्यक्षात घोषणा असली तरी झाडांची निगा राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य असुन आज ऑक्सीजन विकत घेण्याची वेळ आली असुन भविष्यात ऑक्सीजन विकत घ्यायचा नसेल तर झाडे लावण्या पेक्षा झाडांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.असे मत त्यांनी व्यक्त केले आंबेगाव तालुक्यात मंचर,नारोडी ,घोडेगाव ,धामणी,घोडेगाव याठिकाणी शाखा असुन विविध योजनांचा फायदा ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन मॅनेजर आशिष देशमुख यांनी केले.
या ट्री गार्ड चे उद्घाटन बिच्छेंद्र मलिक, झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र पुणे विभाग तसेच अनिल गिरसावळे उप झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र पुणे विभाग यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंचर नगर पंचायत चे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बचत गट यांना मार्गदर्शन तसेच बँकेच्या असणाऱ्या विविध योजनांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास बिच्छेद्र मलिक झोनल मॅनेजर बॅक ऑफ महाराष्ट्र पुणे ,अनिल गिरसावळे उपझोनल मॅनेजर,महेश पाचोरे लेखाधिकारी,चित्रा औटी करविभाग,वरद थोरात कार्यालयीन अधिकारी,रोहन पानसरे वरिष्ठ प्रबंधक पिंपरी झोन ऑफिस,रुख्मीणी झा प्रबंधक झोनल ऑफिस पिंपरी,रवि लोहकरे,निरज पटेल,विशाल गाढवे,सचिन बांबळे नदिम अळवी,अंबाजी झगडे,सिताराम शिंदे,वैभव जाधव,निलेश शिंदे,गणेश टाव्हरे,शिल्पा बनबेरु,मनिषा गावडे मनिषा जारकड,विनायक काजळे ,धनंजय उदावंत,सचिन शहाणे, श्रीराम क्षिरसागर,सुनिता टेकवडे, प्रियांका करंडे,तुकाराम पंदारे,अनिल लोंढे,आदीसह स्थानिक नागरीक तसेच बॅंकेचे खातेदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जागृती महाजन यांनी केले तर श्रीराम क्षिरसागर यांनी आभार मानले.

 जाहिरात