रविवार, दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी आयोजित आपली लोणी मॅरेथॉन पर्व तिसरे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकमेव ठरलेली या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 4000 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. आंबेगाव तालुक्याच्या व लोणीकरांच्या दृष्टीने ही बाब अभिमानास्पद आणि ऐतिहासिक अशी ठरणार आहे. 4000 हून अधिक स्पर्धक सकाळी 5-00 वाजता आपल्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेच्या मैदानावर उपस्थित राहतील. आपल्या सर्वांच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली आहे. आपल्या आरोग्यपूर्ण तयारीसाठी झुंबाची नृत्य टीमही लोणीत दाखल होईल. पोलीस बँडचा वाद्यवृंद सकाळी हजर होईल.आपल्या भेटीला आणि प्रोत्साहन देण्यासाठी तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा तसेच तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील सिद्धार्थ म्हणजेच दूरचित्रवाणी व चित्रपट अभिनेता हार्दिक जोशी उपस्थित राहणार आहे. आणि जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर सुद्धा आपल्या भेटीस येणार आहेत. तुमच्या सहभागाने ही स्पर्धा यशस्वी आणि गौरवशाली होणार आहे. सकाळी 5-00 वाजता शाळेच्या मैदानावर उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांनी केले आहे.























