आंबेगाव महोत्सवाला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे.या महोत्सवात मिळणारी माहिती उपयुक्त असून त्याद्वारे शेतीत विविध प्रयोग करून उत्पादन वाढवता येणार आहे. या महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालिका कल्पना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या आंबेगाव महोत्सवाचे उद्घाटन आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, महेश मोरे, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन निघूट, प्रशांत बागल, सचिन काजळे, ज्ञानेश्वर चव्हाण, सचिन चिखले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडेकर, सुषमा शिंदे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले,राजेंद्र भंडारी, निलेश थोरात, राम गावडे, सुनील बाणखेले,सागर काजळे, योगेश बाणखेले, शिवाजी राजगुरू, सचिन बोराडे आदी उपस्थित होते.
कल्पना आढळराव पाटील पुढे म्हणाल्या मागील दहा वर्षापासून आंबेगाव महोत्सवाचे आयोजन केले जात असून त्याचा फायदा सर्वच क्षेत्रातील नागरिकांना होत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी असे उपक्रम फायदेशीर ठरत आहेत असे सांगून महिलांना प्राधान्य दिले जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महिलांच्या हातात जादू असून त्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ चाखून पाहा असे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक करताना महेश मोरे म्हणाले 50 स्टॉलपासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 225 पेक्षा जास्त स्टॉल सहभागी झाले असून त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचाही सहभाग आहे. माजीमंत्री दिलीप वळसे पाटील व विवेक वळसे पाटील पाटील यांनी कृषी प्रदर्शनाची सुरुवात केली होती. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले तर आभार शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी मानले. दरम्यान आंबेगाव महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दूरवरून नागरिक महोत्सवाला भेट देऊन माहिती जाणून घेत होते तसेच विविध वस्तूंची खरेदी केली जात होती. हा महोत्सव सोमवार पर्यंत सुरू राहणार आहे.
Home आपलं आंबेगाव आंबेगाव महोत्सवामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांना फायदा होत आहे.- कल्पनाताई आढळराव पाटील.