पारगाव ता. आंबेगाव येथे आज गुरुवारी श्री क्षेत्र कोतुळ(ता.अकोले जि.अहिल्यानगर)ते श्री क्षेत्र जेजुरी गड खंडोबा पायी दिंडीचे सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार या घोषात स्वागत करण्यात आले.
या पायी दिंडीचे हे चौथे वर्षे असून पारगाव येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे पारगाव चे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सचिव रामनाथ हिंगे, शिवाजी लबडे, ज्ञानेश्वर लबडे, विश्वंभर वाल्मिक, राहुल लबडे, नामदेव भुतांबरे, सविता भुतांबरे, ऋतिक भुतांबरे, प्रतिक भुतांबरे, साहेबराव भुतांबरे,बाळासाहेब भुतांबरे, उर्मिला भुतांबरे, दत्तु भुतांबरे, जयश्री भुतांबरे, जनाजी मधे, आनंदा मेंगाळ, चंद्रकला जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल ढोबळे व शिवाजी लबडे यांच्या वतीने दिंडीला अल्पोहर देण्यात आला .