गावडेवाडी ता. आंबेगाव येथील हसवड वस्ती येथे रसूल इनामदार यांच्या घरामध्ये आढळलेला अडीच किलो वजनाचा मांडूळ जातीचा साप वन विभागाने शिताफीने पकडून अवसरी बुद्रुक येथील वनविभागाच्या फॉरेस्ट मध्ये सोडून त्याला जीवदान दिले आहे.
गावडेवाडी येथील हसवड वस्ती येथे राहणारे सोहेल पठाण यांना रसूल अंबिर इनामदार यांच्या घरात एक साप जात असताना आढळला त्यांनी ही माहिती तात्काळ बिबट शीघ्र कृती दल, गावडेवाडी यांना दिली ही माहिती मिळताच अवसरी वनरक्षक शिवचरण कर्मचारी अरुण खंडागळे यांनी गावडेवाडीतील शेरी वस्ती येथे जाऊन इनामदार यांच्या घरात घुसलेल्या सापाची पाहणी केली ते मांडूळ असल्याचे लक्षात आले मोठ्या शिताफीने शिवचरण व खंडागळे,इन्नूस इनामदार व ग्रामस्थांच्या साह्याने व्यवस्थित ताब्यात घेऊन. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या सूचनेनुसार अवसरी बुद्रुक येथील वनविभागाच्या नवीन फॉरेस्ट परिसरामध्ये त्याला नैसर्गिक सहवासात सोडून दिले असल्याची माहिती सीएस शिवचरण यांनी दिली.