मंत्रालय महसूल सहाय्यक सिद्धेश पातकर यांचा नागरी सत्कार…..

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

सिताराम काळे, घोडेगाव

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सिध्देश पातकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेली मंत्रालयातील महसूल सहायक परीक्षा उत्तीर्ण केली. या यशाबद्दल त्यांचा घोडेगाव शहराच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव, शालेय शिक्षण समिती, घोडेगाव ग्रामपंचायत व घोडेगाव ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. सिद्धेशचे पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे झाले. त्यानंतर ५ ते १२ वीपर्यंतचे शिक्षण जनता विद्या मंदिर घोडेगाव येथे झाले असून, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोणावळा या ठिकाणी त्याने मेकॅनिकल इंजिनिअर केले आहे. जुलै २०२१ पासून एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी सिद्धेशने तयारी सुरू केली. आता तो एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाल्याने पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ काळे, मनसे अध्यक्ष संतोष बो-हाडे, हेमंत काळे, प्रमोद अर्विकर, अॅड. गायत्री काळे, राजु घोडे, सरपंच अश्विनी तिटकारे, उपसरपंच कपिल सोमवंशी, सुनील इंदोरे, अमोल काळे, शरद बॅंक संचालक रुपाली झोडगे, रत्ना गाडे, क्रांती गाढवे, मुख्याध्यापिका अलका चासकर, राजाराम काथेर आदि उपस्थित होते. तसेच श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेले विकास काळे व अंकिता काळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

सिध्देशचे वडील सुनील अशोक पातकर हे माथाडी हमाल तसेच आई सुरेखा या मोलमजुरी करून सिध्देशला जितके जमेल तेवढे शिक्षणासाठी आपल्या परीने हातभार लावत असत. अखेर सिध्देशने यशाला गवसणी घालत घोडेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सोमनाथ काळे यांनी सांगितले.

 जाहिरात