दरवर्षीप्रमाणे याहिवर्षी शासकीय तंत्रनिकेतन व शासकिय अभीयांत्रीकी महाविदयालय, अवसरी (खुर्द) च्या विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सव समिती अंतर्गत होणारा भव्य शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
ह्या शिवजन्मोत्सवाचे हे बारावे पर्व आहे सुरुवातीच्या काळामध्ये छोट्या स्वरूपात असलेले हा सोहळा आता खूप मोठ्या प्रमाणात व जल्लोषात साजरा होत आहे.
यामध्ये सेवाविभागांतर्गत दि. 14 फेब्रुवारी (शुक्रवार रोजी रक्तदान व stem cells doner नोंदणी शिबीर घेण्यात आले, तसेच यावर्षी शिवजयंती उत्सवास दोन दिवसाचे स्वरूप देण्यात आले होते, यामध्ये दि. १८ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी बौद्धिक विभागातंर्गत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या जसे की, रांगोळी, वक्तृत्व, वाद-विवाद, प्रश्नमंजुशा, रील मेकिंग, पोस्टर मेकिंग (online, offline) बुद्धीबळ यांचा समावेश होता. व त्यानंतर शाहिरी पोवाड्याचा व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यासाठी लाभलेले शाहिर श्रीकांत रेणके व सचिन देवरे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शिवज्योत पूजन कुरून पुढिल कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शिवजयंती चे मुख्य आकर्षण म्हणजे भव्य मिरवणुक. या मिरवणुकीची सुरुवात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या गेट समोरून करण्यात आली. यामध्ये शारिरीक विभागातंर्गत विविध पथकांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले जसे की, ढोल पथक, ध्वज पथक, झांज पथक, लेझिम पथक, मर्दानी पथक, तसेच बौद्धिक विभागातंर्गत पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले. या मिरवणुकिचा समारोप व बक्षिस वितरण शिवजयंती सराव मैदानावर घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी कॉलेजचे आजी-माजी विद्यार्थी शिक्षक वृंद, सर्व इतर कर्मचारी तसेच अवसरी खुर्द गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य समस्त ग्रामस्थ अवसरी खुर्द, मंचर तसेच मंचर पोलीस स्टेशन व परिसरातील सर्व नागरिक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.























