घरकुल बांधण्यास शासनाने ५ ब्रास वाळू मोफत द्यावी मा.उपसरपंच विठ्ठल ढोबळे…

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

आंबेगाव तालुक्यात सुमारे चारशे पेक्षा जास्त घरकुले मंजूर असून नुकतेच त्याचे शासकीय स्तरावर भूमिपूजन झाले आहे, मात्र घरकुल धारकांना वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे घरकुल बांधण्यास अडचण होत आहे, महसूल प्रशासनाने या घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवावी अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.

राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू देण्याची घोषणा केली आहे आंबेगाव तालुक्यातील अनेक घरकुले घरकुलांची बांधकामे वाळू अभावी ठप्प झाली आहेत. आंबेगाव तालुक्यात घोड नदीवर वाळूच्या साठे मुबलक प्रमाणात शिल्लक आहेत, आंबेगाव महसूल प्रशासनाने या घरकुल लाभार्थ्यांना ही वाळू पुरवावी त्यामुळे या लाभार्थ्यांना त्वरित पाच ब्रास वाळू पुरवावी अशी मागणी आंबेगाव जुन्नरचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, शासनाने घोषित केल्याप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत करण्यात येणार आहे, घोड नदीवर मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे शिल्लक आहेत. गरजू लाभार्थ्यांना ही वाळू पुरवावी अशी आग्रही मागणी विठ्ठल ढोबळे यांनी प्रांताधिकांऱ्या कडे केली आहे. यावेळी विठ्ठल ढोबळे, बजरंग देवडे, सुरज ढोबळे आदी उपस्थित होते.

 जाहिरात