आंबेगाव – शिरुर- विधानसभा मतदारसंघासाठी, आंबेगाव तालुक्यातील मागासवर्गीय वस्तीसाठी रु.१४१.०० लक्ष मंजूर – विष्णूकाका हिंगे….

 जाहिरात

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीपर वळसे पाटील यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद,समाजकल्याण विभागांतर्गत २० % जिल्हा परिषद निधी २०२४-२५ मधून मागासवर्गीय वस्ती येथे रस्ते बांधकाम करणे, या शीर्षकाखाली आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघासाठी, आंबेगाव तालुक्यातील मागासवर्गीय वस्तीसाठी १४१.००लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी बु. कोळीआळी येथे रस्ता काँक्रिट करणे – रु. 8.50 लक्ष,
अवसरी बु. जाधववस्ती ते दूध डेअरी रस्ता काँक्रिट करणे रु. 8.50 लक्ष, लोणी – पंचरासवस्ती येथे रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष, टाव्हरेवाडी येथे भिल्लवस्ती रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष, जारकरवाडी लोलेवस्ती ते ढोबळेवाडी रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष, गावडेवाडी माथावस्ती शिव रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष, काठापूर बु. वेस ते नदी बंधारा रस्ता करणे रु. 8.00 लक्ष,
ठाकरवाडी (चास) येथे पिराचीवाडी रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष,जारकरवाडी काकडेमळा रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष, शिंगवे सोनवणेवस्ती क्र. २ ते जल शुद्धीकरण प्लांट रस्ता काँक्रिट करणे रु. 8.50 लक्ष, चांडोली बु. कान्होबा मंदिर ते नदी बंधारा जोडरस्ता करणे रु. 8.50 लक्ष,
अवसरी खु. येथे प्रा.आ.केंद्र ते बौद्धवस्ती रस्ता काँक्रिट करणे रु. 8.00 लक्ष, जांभोरी तिटकरेवस्ती रस्ता काँक्रिट करणे – रु.5.00 लक्ष, जांभोरी लिंबोनेचीवाडी रस्ता काँक्रिट करणे – रु. 3.00 लक्ष,
फुलवडे येथील मोहरेवाडी ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिट करणे रु. 5.00 लक्ष,तिरपाड अंतर्गत नानवडे – ढकेवाडी येथे समाजमंदिर बांधणे रु.7.00 लक्ष, टाकळी हाजी ता.शिरुर येथे आपटेवस्ती रस्ता काँक्रिट करणे – रु.8.00 लक्ष, पिंपरी दुमाला ता.शिरुर येथील अमोल डोळस घर ते शेलार घर रस्ता काँक्रिट करणे रु.6.00 लक्ष, पिंपळे खालसा ता.शिरुर येथे रामगुडेवस्ती रस्ता काँक्रिट करणे रु.8.00 लक्ष अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी दिली.

 जाहिरात