लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने दहा लॅपटॉप…..

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

रयत शिक्षण संस्थेच्या चांडोली बुद्रूक (ता.आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालय भागशाळेतील विद्यालयास लीला पूनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून दहा लॅपटॉप भेट देण्यात आले. त्या सुसज्ज लॅपटॉप प्रयोगशाळेचे अनावरण फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉ.फिरोज पुनावाला यांच्या हस्ते करण्यात आले.

लीला पुनावाला फाउंडेशनच्या वतीने महात्मा गांधी विद्यालयातील 25 विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान मिळावे व भविष्यात विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) शिक्षण घेता यावे म्हणून डॉ.फिरोज पूनावाला यांच्या 89 व्या वाढदिवसाचे निमित्त साधून महिंद्रा कोटेक कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी व पूनावाला फाउंडेशन यांच्या माध्यमातून दहा लॅपटॉप देण्यात आले.
यावेळी महिंद्रा कोटेक कंपनीचे विभाग प्रमुख तरुण कुमार, कस्टर प्रमुख ओंकार जलादी, शाळा व्यवस्थापक कल्याणी नानचकर, वरिष्ठ समन्वयक विदुला करंदीकर, संपर्कप्रमुख फरदार शेख, सोनाली सूर्यवंशी, शाळा समन्वयक प्राजक्ता मॅडम, प्राचार्य उत्तम आवारी, ज्ञानेश्वर थोरात गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात, समितीचे सचिव अजित थोरात, कमिटीचे सदस्य अतुल थोरात, सोसायटीचे सदस्य अक्षय खरमाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण थोरात, मुख्याध्यापिका दिपाली अजाब, विनोद बोंबले, सुनील वळसे, अविनाश ठाकूर उपस्थित होते. यावेळी डॉ.फिरोज पूनावाला यांचा विद्यार्थ्यांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांचा ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य संदीप थोरात यांनी पुनावाला यांचे विद्यार्थ्यांविषयी असलेले प्रेम पाहून भरभरून त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दशरथ काळे, सूत्रसंचालन संतोष दरेकर व आभार अक्षय खरमाळे यांनी मानले.

 जाहिरात