आज दि. १२ मे रोजी श्री क्षेञ भीमाशंकर अभयारण्यामध्ये बुध्द पौर्णिमेचे औचित्य साधत राञी जंगलामध्ये असलेल्या नऊ पाणवठ्यांच्या जागी लाकडे,पाला पाचोळा ,दगड गोटे, व झाडे झुडपे यांच्या सहाय्याने बनविण्यात आलेल्या मचानावरती बसुन प्राण्यांची पहाणी व प्राणी गणना करण्यात येणार आहे या मध्ये वन्यजीव विभागाच्या कर्मचार्यांबरोबरच हौशी निसर्ग प्रेमी देखील सहभागी होणार असल्याचे भीमाशंकर अभयारण्य- १ चे वनपरिक्षेत्र अधिकारी रंणजित जाधव यांनी सांगितले.
बुध्द पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी भीमाशंकर वन्यजीव विभागाच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते. बुध्द पौर्णिमा मे महिन्याच्या कडक उन्हाळयात येत असल्याने जंगलातील पाने गळून गेलेली असतात. त्यामुळे लांबपर्यंत प्राणी मचाणावरून दिसतात. तसेच उन्हाळयाच्या दिवसातील सर्वाधिक प्रकाशमान रात्र असते. भीमाशंकर वन्यजीव विभागाने दि. १२ रोजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशामध्ये जंगलातील पाण स्थळांंवर येणाऱ्या प्राण्यांची पाहणी, निरीक्षण व निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविला आहे. कडक उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये मोजके ठिकाणी पाणी शिल्लक राहते या ठिकाणी हमखास प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. म्हणून या ठिकाणी उंच असे मचान बनवून प्राण्यांचे निरीक्षण व हौशी निसर्गप्रेमींना प्राणी पाहण्याचा अनुभव घेता येतो. गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला निसर्ग प्रेमी यांना उदमांजर, ससा, सांबर, रानडुक्कर, भेकर,मोर, घुबड, आदी प्राणी प्रत्यक्षात पहावयास मिळाले होते
ह्या वर्षी भीमाशंकर वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या वनपरिक्षेञ अधिकारी रणजित जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या मध्ये पुणे परिसर मुंबई असे अनेक हौशी निसर्गप्रेमी सहभागी होणार आहेत या सर्वांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उकाड्यात थंडगार हवा पहाटे पडणारे धुके पाणवठ्यावरती येणारे प्राणी पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे.
याच बरोबर आंबेगाव तालुक्यातील सर्व वनविभागातील परिसरात प्राण्यांची गणना होणार आहे असे बिबट कृती दलाचे सदस्य मनोज तळेकर यांनी सांगितले.