महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र त्यांची ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. 12 वीच्या निकालानंतर आता लवकरच 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता याच महिन्यात जाहीर होणार आहे. उद्या दिनांक 13 मे मंगळवार रोजी 1 वाजता जाहीर होणार असून महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सवर आपला निकाल चेक करू शकता.