कृषि उत्पन्न बाजार समिती, मंचर भाजीपाला बाजार भाव..

 जाहिरात

मंचर :कृषि उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे आज दि.१९ मे रोजी तरकारी शेतमालाची मोठी आवक झाली.घेवडा या शेतमालाला दहा किलोला ९०० असा बाजार भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.

मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची तरकारी आंबेगांव,खेड,जुन्नर, पारनेर, शिरुर या भागांतुन मोठया प्रमाणांवर शेतकरी तरकारी या शेतमालाचीआवक विक्री साठी घेऊन येत असतात. मंचर बाजार समितीत शेतक-यांच्या समोर मालाचे वजन केले जाते व त्या शेतक -यांला आपल्या मालाचे वजन तसेच मालाची काय भावात विक्री झाली आणि त्याच्या मालाची किती रक्कम झाली ते त्याच्या मोबाईलवर लगेच एसएमएस व्दारे कळते. पाच तालुक्यांतुन शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात असे सभापती थोरात यांनी सांगितले.

मंचर बाजार समितीमध्ये तरकारी या शेतमालाल १० किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला. कंसात आवक.

कैरी-(४५६)-२५०-४५० काळावाल-(६)-२५०-५०० कारले(१५४)-३००-५०० गवार-(३२५)-६०০ घेवडा-(७)-४८०-९००০ चवळी-७३)-२५०-४५० ढोबळी मिरची (२०५) -३००-५५० भेंडी-(८४)-२००-३५০ फरशी-(५१)-२००-५००,प्लॉवर- (२२१७ )- १२०-२२५ भुईमुगशेंगा-(१२)-४০০-६০० दोडका- (३२)-२८०-५०० मिरची- (३२६)-१००-५५० तोंडली-(२८)-१०० ४०० शेवगा-(८)-३५०-५७५,लिंबु- (६)-५००-६०० असा शेतमालाला बाजारभाव मिळाला असे बाजार समितीचे प्रभारी सचिव सचिन बो-हाडे यांनी सांगितले,

 जाहिरात