मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव किंचित वाढला आहे आज मंगळवारी दहा किलो कांदा १५० रुपये या भावाने विकला गेला आहे. अशी माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी १० किलोला १५० रुपये असा बाजारभाव मिळाला. ६५९० हजार पिशवी कांद्याची आवक झाली. परवा म्हणजेच १९ तारखेला झालेल्या लिलावामध्ये कमल बाजार भाव १३५ ते किमान ४५ होता. आज झालेल्या लिलावामध्ये चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला १५० रुपये या भावाने विकला गेला आहे.
मंचर बाजार समितीत कांद्याचे प्रति दहा किलोचे दर
सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा रुपये १४० ते १५० रुपये,सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १२० ते १३० रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १००ते १२० रुपये, गोल्टी कांद्यास ८० ते १०० रुपये, बदला कांद्यास ३० ते ७० रुपये असा बाजारभाव मिळाला.