पारगाव – मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील विशाल दांगट व दिपाली थोरात यांचा शुभविवाह काही दिवसांपूर्वी संपन्न झाला. शुभविवाह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महापूजा कार्यक्रमात विशाल दांगट यांच्या मित्रांनी विशाल व दिपाली यांना फळाफुलांचे वृक्ष भेट स्वरूपात देत या नवदांपत्यासह उपस्थित पाहुण्यांना झाडे लावा झाडे जगवाचा संदेश दिला आहे.
मेंगडेवाडी येथिल दांगट कुटुंबातील विशाल सुभाष दांगट व दिपाली थोरात यांचा विवाह मंगळवार दि. १३ रोजी निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत आळंदी येथे साध्या पद्धतीने संपन्न झाला. लग्नानिमित्त दि.१८ रोजी महापूजा व जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विशाल यांच्याबरोबर पराग मिल्क फूड्स येथे कार्यरत असलेले त्याचे सहकारी मित्र पराग मिल्क फुड्स चे दूध संकलन विभागाचे व्यवस्थापक अनिल पाटील, दूध संकलन अधिकारी सागर शिंदे, मयुर देवकर, शैलेश जाधव, अजिंक्य साकोरे, सागर गव्हाणे, प्रकाश पांडे, अभिजित घायाळ यासह इतर मित्रांनी मित्रांनी विशाल व दिपाली यांना नारळ, मोसंबी, अंजीर, सफरचंद, संत्रा, पेरू, जांभूळ, चिंच, चिक्कू, सीताफळ, सोनचाफा, मोगरा, जाई, ॲपल बोर, आडुळसा, आवळा, आंबा, गुलाब, जास्वंद, फणस, रामफळ या सह विविध फळ फुलांचे वृक्ष भेट स्वरूपात दिले व हे वृक्ष शेतात बांधावर लावून वृक्षाचे जतन करण्यास सांगितले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी झाडे लावून ती झाडे जगविणे गरजेचे आहे. वैवाहिक आयुष्यात सुरुवात करत असताना माझ्या मित्रांनी मला वृक्ष भेट दिले असून या वृक्षाचे संगोपन व्यवस्थित रित्या करणार आहे.. दिपाली विशाल दांगट























