बिबट्यांची वाढती संख्या पाहता बिबट्या आपला सहकारी झाला आहे,त्याला सोबत घेऊनच आपल्याला चालायचे आहे.निसर्गात मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असून याला मानवच जबाबदार आहे हे प्रदूषण दुरुस्त करणे देखील निसर्गाच्या हातात आहे त्यामुळे झाडे लावण्यापेक्षा झाडे जगवण्यावरती लक्ष द्या व निसर्गनिर्मित झाडे तोडू नका असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या घोड प्रकल्प वनविभाग, जुन्नर च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बिबट शीघ्र कृती दलाचे उद्घाटन अवसरी बुद्रुक, गावडेवाडी येथे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, या वेळी उप वनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते, उप वनसंरक्षक स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, अवसरी सरपंच सारिका हिंगे, गावडेवाडी सरपंच विजय गावडे, उपसरपंच अनिल हिंगे, पोलीस पाटील माधुरी जाधव, कल्याण हिंगे ,आजित चव्हाण, प्रशांत वाडेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते म्हणाले जुन्नर तालुक्याबरोबरच आंबेगाव तालुक्याची ओळख हि अता बिबट म्हणून महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. अवसरी/गावडेवाडी येथील बेसकैम्प हा नावीन्य पूर्ण आहे. या मार्फत बिबट संदर्भात जन जागृती करण्यात येत आहे. या सर्वांचा प्रामाणीक उद्देश्य आहे की सभोतालच्या शेतकर्यांचा फायदा झाला पाहिजे. अवसरी ग्रामस्थांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी १७ हेक्टर जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव यांनी केलेल्या सुसज्ज वनउद्यान या ठिकाणी ऊभे करण्याचे सुचविले आहे. तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी देखील सुसज्ज वसाहत उभारणार आहे. असे वन उपवनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांनी यावेळी सांगितले .
यावेळी कल्याण हिंगे अनिल हिंगे विजय गावडे यांनी आपली मनोगते व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत शिंदे यांनी केले उपस्थितांचे आभार वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी केले तर सूत्रसंचालन सोनल भालेराव यांनी केले.