मेजर सुनील शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथिल मेजर सुनील सोनबापू शिंदे (वय ३९) यांचे पुणे येथे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये आजाराने शनिवारी दि.७/५/२०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. 

मेजर सुनिल शिंदे यांची सन २००६ मध्ये लष्करात भरती झाली होती. हिमाचल प्रदेश ,जम्मू काश्मीर, बिहार या परिसरात त्यांनी देशाची सेवा केली आहे. त्यांना मेजर ही बढती मिळाली होती. पुण्याच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे अवसरी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले रविवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहाची फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली. दर्शनासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. अवसरी खुर्द ग्रामपंचायत व लष्कराच्या वतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लष्करातील अधिकारी व आंबेगाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या मागे आई लक्ष्मीबाई शिंदे, वडील सोनबापू शिंदे, पत्नी सारिका शिंदे, कन्या आयुशा व कृतिका तर विजय शिंदे व अजय शिंदे हे त्यांचे बंधू होत.

 जाहिरात