कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे मेथीचे बाजारभाव कडाडले प्रति शेकडा ६००१ रुपये, प्रति जुडी ६० रुपये.       

 जाहिरात

मंचर : कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवार दि. १२ जून रोजी भाजीपाला लिलावात कळंब येथील शेतकरी खंडू गोपाळा भालेराव या शेतकऱ्याच्या मेथीला सर्वाधिक उच्चंकी लिलावात लिलावात झालेल्या लिलावात बोली बोलून बाजारभाव प्रति जुडी ६० रुपये दराने भाव मिळाला. चांगला बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश (स्वामी ) थोरात यांनी दिली.           

मंचर बाजार समिती येथे चार तालुक्यांमधील शेतीमाल विक्रीसाठी येत असतो, काल सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबिरीला प्रति जुडी २१ रुपये तर शेपू प्रतिजुडी रुपये असा बाजार भाव मिळाला, शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला मंचर बाजार समिती येथे विक्रीसाठी आणावा अशी आवाहन बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी केले.

 जाहिरात