भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रक्तदान शिबिर संपन्न….

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव व शिरूर तालुक्यात जनविश्वास सप्ताह (दि. २२ जुलै ते ३१ जुलै) असा साजरा करण्याचा संकल्प केला आहे. त्या संकल्पाअंतर्गत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार (दि. २५) रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, पोपटराव थिटे, नितीन वाव्हळ, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, चीफ अकौटट राजेश वाकचौरे, महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे, बी.डी. चव्हाण, वसंत जाधव, वैभव उंडे, दौलत लोखंडे, अशोक आदक, निलेश पडवळ, पिंटू पडवळ, दिलीप लोखंडे, कारखान्याचे कर्मचारी, महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. यावेळेस १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 जाहिरात