आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत तरुणाईने पुढाकार घेतला, तर आंबेगाव तालुका आणखी प्रगत होईल,वळसे पाटील….

 जाहिरात
 जाहिरात
 जाहिरात

“अलीकडील विधानसभा निवडणुकीत आपल्याला कमी मताधिक्याने विजय मिळाला असला तरी पुढील चार वर्षे मी आमदार म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यामुळे विरोधकांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. विधानसभेतील मतांचा वाचपा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काढण्याची आता आपल्याला संधी आहे,” असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांनी केले.                                           युवक व युवती मेळावा – आंबेगाव तालुका” हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव–शिरूर यांच्या वतीने आयोजित प्रेरणादायी व उत्साहवर्धक कार्यक्रम शिवगिरी मंगल कार्यालय, मंचर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात तरुणाईच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी, समाजपरिवर्तनाच्या प्रवाहात नव्या पिढीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. समाजकार्य, शिक्षण, रोजगार आणि राजकारणातील जबाबदारी या विविध विषयांवर चर्चासत्रे झाली.

या वेळी बोलताना वळसे पाटील म्हणाले “जोपर्यंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यात कार्यरत आहेत, तोपर्यंत आपल्या आंबेगाव तालुक्यातील सर्व विकासकामे त्यांच्या माध्यमातून सातत्याने मार्गी लावत राहणार आहे. याबाबत जनतेने चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सर्व तरुणांनी एकजुटीने व जोमाने कामाला लागावे. पुढील दीड महिना हे काम निर्णायक ठरणार आहे.”

या कार्यक्रमास म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी आढळराव, संध्या सोनवणे, अण्णा महाडिक, बाळासाहेब बेंडे, विष्णू काका हिंगे, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, सचिन भोर, निलेश थोरात, वैभव उंडे, अनिल वाळुंज, सचिन पानसरे,पूर्वा वळसे पाटील, तुलसी भोर, अंकिता अनिल वाळुंज,रवींद्र करंजखिले, दिपक पोखरकर , संदिप टेमकर, प्रमोद वाघ, यांसह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते

युवक हे समाजघटकाचे सर्वात मोठे बळ आहे. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी आणि विकासाची तळमळ आहे. नामदार दिलीप वळसे पाटील नेहमीच युवकांना संधी देत आले आहेत आणि त्यांचा सहभाग हा विकासाच्या प्रवासात निर्णायक ठरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत तरुणाईने पुढाकार घेतला, तर आंबेगाव तालुका आणखी प्रगत होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे,” अशी भावना पूर्वा वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

 जाहिरात